हेअर स्ट्रेट करताना काळजी घेतली तर तुमचे केस होणार नाहीत *डॅमेज*

हेअर स्ट्रेट करताना काळजी घेतली तर तुमचे केस होणार नाहीत *डॅमेज*

केस सरळ केल्यानंतर मी अधिक चांगली दिसते असे म्हणत अनेकजण रोज स्ट्रेटनिंग करतात. म्हणजे सकाळी उठळ्यानंतर अनेक महिलांचा तो दिनक्रम ठरलेलाच असतो.परंतु केसांच्या आरोग्यासाठी सतत स्ट्रेटनिंग करणे चांगले नाही.  हे माहीत असूनही अनेकदा आपल्याला आपला लूक कॉम्प्रोमाईज करायचा नसतो. पण सरतेशेवटी जेव्हा केस गळू लागतात आणि पातळ होऊ लागतात. तेव्हा आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला जातो. पण जर तुम्ही स्ट्रेटनिंग करतानाच थोडी काळजी घेतली तर तुमचे केस चांगले दिसतीलच शिवाय ते *डॅमेज* देखील होणार नाही.


चांगल्या मशीनची निवड


स्वस्तात मस्त हेअर स्ट्रेटनिंग मशीन घेण्याचा अनेकांचा हव्यास असतो. कमी किंमतीत मिळणाऱ्या मशीन  या निकृष्ट दर्जाच्या असतात. ज्या पुढे हेअर डॅमेजचे कारण बनतात. आता चांगल्या स्ट्रेटनिंग मशीन निवडताना स्ट्रेटनिंग मशीनमध्ये सिरॅमिक प्लेट आहेत का पाहा. कारण सिरॅमिक प्लेट तुमच्या केसाला आवश्यक तितकीच हिट देते. त्यामुळे तुमचे केस कोरडे, शुष्क होत नाही. तर केस चमकदार दिसतात.अनेकजण झटपट केस सरळ होण्यासाठी थेट इस्त्रीचादेखील वापर करतात. ते तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी सगळ्यात जास्त धोकादायक आहे. कपड्यांच्या इस्त्रीची उष्णताही केसांसाठी योग्य नाही. त्यामुळे झटपट केस सरळ होण्यासाठी इस्त्रीचा वापर करु नका तर चांगली हेअर स्ट्रेटनिंग मशीनची निवड करा.


hair strightner 1


केस झटपट वाढवायचे आहेत? मग तुम्ही हे वाचायला हवे


 ओल्या केसांवर स्ट्रेटनिंग करणे टाळा


कामावर जाण्यासाठी उशीर झाला की, आपसुकच आपण सगळ्या गोष्टींमध्ये शॉर्टकट मारायला लागतो. ओल्या केसांवर स्ट्रेटनिंग करण्याची अनेकांना सवय असते. केसांवरील पाणी न टिपता तशीच गरम गरम मशीन फिरवली जाते. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी ते अधिक धोकादायक ठरु शकते. ओले केस अनेकदा गुंतलेले असतात.मशीन फिरवताना आापण कंगवा फिरवतो. त्यावेळी ते ओढले जातात. ओढाताणीत केस डॅमेज होतात.


wet hairs


स्ट्रेटनिंग आधी करा हेअर वॉश


आठवड्यातले सातही दिवस स्ट्रेटनिंग करणे टाळा. त्यापेक्षा तुम्हाला खरचं गरज असेल तरच स्ट्रेटनिंग मशीनचा वापर करा. पण ज्यावेळी तुम्ही केस स्ट्रेट कराल त्या आधी चांगल्या शॅम्पूने केस धुवून घ्या. या मागचे कारण इतके की, बाहेर इतके प्रदूषण असते की, धूळ, माती तुमच्या केसांना नकळत चिकटते. ती केसांवरुन काढून टाकली नाही. तर तुम्हाला केसांचे अन्य त्रास होऊ लागतात. उदा. कोंडा वाढतो, केस शुष्क वाटू लागतात, केसांना फाटे फुटू लागतात.


शरीरावरील अनावश्यक केस काढायचे आहेत?


ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंग मशीन वापरणे टाळा


केस वाळवण्यासाठी ब्लो ड्रायर वापरणे आणि त्यानंतर स्ट्रेटनिंग मशीन वापरणे टाळा. कारण असे करणे चांगले नाही कारण तुम्ही एकाचवेळी दोन वेगवेगळे प्रयोग केसांवर करत असतात. त्यामुळे एकाचवेळी ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंग मशीन वापरणे टाळा.


 अॅलोवेरा जेल


स्ट्रेट केलेल्या केसांना आराम देण्यासाठी अॅलोवेरा जेल लावा. जेल हातात घेऊन ती स्काल्पला लावा. थोडासा  मसाज करा. स्ट्रेटनिंग करुन ड्राय झालेल्या केसांना नरिशमेंट मिळते. झोपण्याआधी तुम्हाला अॅलोवेरा जेल लावून ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका. पण त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हेअर स्ट्रेटनिंग मशीनचा वापर करु नका. एक दिवस केस तसेच राहू द्या.


alovera gel


केसांना फाटे फुटलेत? घरगुती उपायांनी मिळेल सुटका


सतत मशीन फिरवू नका


अपेक्षित असलेले सरळ केस मिळेपर्यंत अनेकांना सतत केसांवर मशीन फिरवायची सवय असते.म्हणजे इच्छित असलेले सुपर स्ट्रेट हेअर मिळेपर्यंत काही जणी वारंवार केसांवर मशीन फिरवत राहतात. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक असते. असे सतत केल्यास केस शुष्क होतात आणि गळू देखील लागतात .


 हेअर सीरम उत्तम सवय


केस स्ट्रेट केल्यानंतर ते टिकून राहण्यासाठी केसांना सीरम लावणे आवश्यक असते. त्यामुळे मशीन फिवून झाल्यानंतर हेअर सीरम लावायला विसरु नका. त्यामुळे स्ट्रेटनिंग मशीनच्या उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल.  


 (फोटो सौजन्य-Instagram)