सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट ट्रेंड होईल हे काही केल्या सांगता येत नाही. त्यात जर या ट्रेंडमध्ये सेलिब्रिटी असतील तर मग काय बघायलाच नको. वाघाचा फिल्टर घेऊन सध्या सगळे सेलिब्रिटी फोटो पोस्ट करत आहे. आधी हे फोटो कोणत्या प्रमोशनचा भाग आहेत असे सगळ्यांनाच वाटले. पण एका मागोमाग सगळे सेलिब्रिटी फोटो पोस्ट करु लागल्यानंतर काही तरी वेगळे आहे हे लक्षात आले. इन्स्टाग्रामवर झोया अख्तरचे स्वागत करण्यासाठी सगळ्यांनी असे मुखवटे लावून फोटो काढले आहेत.
आता झोया अख्तर कोण किंवा तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहायला जर तुम्ही पटकन इन्टाग्रामवर जाणार असाल तर थोडं थांबा याचे कारण असे की, झोया अख्तर नाही तर झोया अख्तरचे प्रोडक्शन हाऊस Tiger baby films इन्स्टाग्रामवर ऑफिशिअली आले आहे. गुरुवारी हे फोटो आल्यानंतर या प्रोडक्शन हाऊसवरुन पडदा उठला. झोया अख्तर आणि रिमा कागती एकत्रितपणे हे प्रोडक्शन हाऊस चालवतात. त्यांनी या आधीही एकत्र काम केले आहे आणि त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेले चित्रपट आणि वेबसिरीज चांगले चालले सुद्धा आहेत.
झोया आणि रिमा यांचे प्रोडक्शन हाऊस फारच नवे आहे. म्हणजे इतर प्रोडक्शन हाऊसच्या तुलनेत त्यांना फारच कमी अनुभव आहे. पण असे असले तरी झोया आणि रिमाने आतापर्यंत चांगल्या चित्रपटाची आणि वेबसिरिजची निर्मिती केली आहे. यंदा सगळ्यात जास्त गाजलेला ‘गली बॉय’, ‘मेड इन हेवन’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘लस्ट स्टोरीज’ अशा काही गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यामुळे झोया आणि रिमाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहे. त्यांचे वेगवेगळ्या प्रोजेक्टवर सध्या काम सुरु असल्य़ाचे कळत आहे. 2019 त्यांच्यासाठी लकी ठरल्यानंतर आता 2020 मध्ये ते काय जादू करणार ते ही पाहावे लागेल.
झोया अख्तर ही संगीतकार जावेद अख्तर यांची मुलगी असून तिने अभिनयापेक्षा दिग्दर्शन क्षेत्रात काम करणे पसंत केले आहे. त्यामुळे तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनानंतर ती आता प्रोडक्शन क्षेत्रातही उतरली आहे. झोयाने हे प्रोडक्शन रिमा कागतीसोबत सुरु केले आहे. रिमा आणि झोया यांनी दिग्दर्शन क्षेत्रात एकत्र काम केले आहे. झोया अख्तरचा भाऊ फरहान अख्तर अभिनेता असून तिने त्याचेही काही चित्रपट दिग्दर्शित केले आहे.
आता या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीतून आणि दिग्दर्शनातून स्वत:ला सिद्ध केले आहे. झोया आणि रिमाची ही जोडी ही #girlpower आहे. म्हणूनच हा हॅशटॅगसुद्धा सध्या जास्त ट्रेंड होत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीनी ही पोस्ट केले आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.