जेव्हा रजनीकांतला राग येतो तेव्हा... वाचा नेमकं प्रकरण काय?

जेव्हा रजनीकांतला राग येतो तेव्हा... वाचा नेमकं प्रकरण काय?

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीही केले तरी त्याची अगदी चर्चा होते. आजही त्यांचे चित्रपट लागले की, लोक आजही अगदी  रांग लावून चित्रपट पाहायला जातात. पण याच सुपरस्टार रजनीकांतला जेव्हा राग येतो तेव्हा मात्र काय होते ते तुम्ही पाहायलाच हवे. कारण रजनीकांत यांचा एक अँगी अवतारातील फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या चित्रपटाचा भाग असून लवकरच थल्लैवा एका नव्या अवतारात दिसणार आहे.

कोणत्या चित्रपटाचे आहे हे पोस्टर

Instagram

रजनीकांत आता ‘दरबार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा हा लुक असून 11 सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांचा या चित्रपटातील लुक शेअर केला आहे. दरबार या चित्रपटाचे हे दुसरे पोस्टर असून या पोस्टरमध्ये अँग्री लुकमधील रजनीकांत दिसत आहे. या चित्रपटात ते एका पोलिसाची भूमिका साकारत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. हा चित्रपट 2020 या वर्षात पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरसाठी आपल्याला थोडे थांबावे लागणार आहे.

तापसी पन्नूचं लवकरच 'शुभमंगल सावधान', केला खुलासा

यांच्याही आहेत प्रमुख भूमिका

Instagram

आता या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत नयनतारा दिसणार आहे. नयनतारा स्वत: एक साऊथ स्टार आहे. त्यामुळे तिचा फॅन फॉलोवरही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहे. या शिवाय या चित्रपटात पहिल्यांदाच  सुनील शेट्टी आणि प्रतिक बब्बर निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे याचीही उत्सुकता लोकांना आहे. 

आता हा चित्रपट जमा करणार किती कोटींचा गल्ला

रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे त्याची कमाई ही कोटींमध्येच विचारावी लागते. कारण रजनीकांत यांचा शेवटचा चित्रपट हा 2.0 हा होता. या चित्रपटाने तब्बल 500 कोटींची कमाई केली होती. लोकांनी वेड्यासारखा या चित्रपटाला प्रतिसाद दिला होता. 2.0 मध्ये विलनच्या रुपात अक्षय कुमार दिसला होता. तर रोबोच्या रुपात अॅमी जॅक्सन या चित्रपटात दिसली.शिवाय त्या चित्रपटातील मागील भाग पुढे नेण्यात आला आहे. तर आता येणारा दरबार या चित्रपटात रजनीकांतची  पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे. म्हणजे यामध्ये भरपूर अॅक्शन आणि ड्रामा आलाच. त्यामुळे हा 2.0 या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडतो का हे पाहायला हवे. 

पोस्टरसाठी स्पर्धा

ए. आर. मुरगादोस हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून लोकांनी या चित्रपटामध्ये अधिकाधिक गुंतावे यासाठी स्पर्धा देखील ठेवली आहे. त्यांनी या चित्रपटाचे क्रिएटीव्ह पोस्टर बनवण्याची स्पर्धा जाहीर केली असून  पुढच्या वर्षी 25 जुलैपर्यंत या चित्रपटाचे क्रिएटीव्ह पोस्टर टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही थल्लयैवा फॅन असाल तर मात्र तुम्ही पोस्टर बनवण्याचा प्रयत्न नक्की करुन पाहायला हवा

आता आदेश बांदेकरच्या घरी रंगणार ‘पैठणीचा खेळ’

साहो जबरदस्त हिट

Instagram

साऊथ मधील ‘साहो’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाबाबत लोकांच्या फारच मिश्र प्रतिक्रिया आहेत. पण तरीदेखील या चित्रपटाने प्रभासच्या नावावर चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटावर कितीही टीका केल्या जात असल्या तरी पैसावसुल अशी ही फिल्म झालेली आहे.

आता रजनीकांत यांच्या दरबार या चित्रपटाचे  #updatedarbar काय असणार त्यासाठी थोडं नक्कीच थांबावं लागेल.

सॅक्रेड गेम्सच्या कलाकारांना मिळतेय लोकांची पसंती