अग्गंबाई सूनबाईमधील सोहम- शुभ्राचे बदलते रुप पाहून चक्रावले प्रेक्षक

अग्गंबाई सूनबाईमधील सोहम- शुभ्राचे बदलते रुप पाहून चक्रावले प्रेक्षक

‘अग्गंबाई सासूबाई’ पुढचा भाग अग्गंबाईन सूनबाई नुकताच सुरु झाला आहे. या मालिकेला प्रेक्षकांची इतकी भरभरुन पसंती मिळाली की मालिका भरकटू नये म्हणून या मालिकेने चांगलाच लीप घेतला. घाबरी घुबरी आसावरी आता बिझनेस वुमन झाली आहे. अभिजीत राजे होम मेकर,सोहम सभ्य मुलगा आणि खमकी शुभ्रा आता बबड्याच्या आईच्या मोडमध्ये गेली आहे. मालिकेतील इतरांचा बदल सगळ्यांना स्वागतार्ह वाटला तरी घाबरी घुबरी शुभ्रा मात्र कोणालाही फारशी आवडलेली दिसत नाही. बदलले सोहम आणि शुभ्रा पाहत प्रेक्षकही चांगलेच चक्रावले आहे. प्रेक्षकांनाही हा नवा बदल फारसा काही रुचला नसावा असेच दिसत आहे.

अण्णा नाईकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद..जाहिरातीने माजवली धूम

खमकी शुभ्रा झाली जुनी आसावरी

अग्गंबाई सासूबाईमध्ये नवऱ्याच्या खोट्याला खोट दाखवून त्याला सुधरवणारी आणि सासूला आधार देणारी शुभ्रा अनेकांना आवडली होती. तिचे ते वागणे पाहून सून असावी असेच वाटत होते. पण आता या नव्या सीझनमध्ये शुभ्रा पूर्णपणे बदललेली दिसत आहे. आता शुभ्रा ही जुनी आसावरी झाली आहे. तिला मुलगा झाला असून मुलाचे हट्ट पुरवताना ती त्याचा बबड्या करतेय हे तिला देखील कळेनासे झाले आहे. मालिकेच्या दुसऱ्याच भागात शुभ्राचा हा अवतार पाहिल्यानंतर कुठे गेली ती जुनी शुभ्रा असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला आहे. कारण अशी भोळी आणि मुलाचे नको ते हट्ट पुरवणारी शुभ्रा कोणालाही फार पचनी पडली आहे असे दिसत नाही. तिची जुनी आसावरी झाली अशा प्रतिक्रिया येत आहेत. ही मुळमुळीत शुभ्रा त्यामुळे टीकेचा विषय झाली आहे. 

गोड चेहऱ्यामागील व्हिलन कायम

Instagram

चेहरा बदलला तरी नियत बदलता येत नाही असे म्हणतात ते अगदी  खरे आहे. सोहम पहिल्या भागात आपल्या चुका सुधारतो आणि कुटुंबात एकत्र राहायला सुरुवात करतो. अनेकांना सोहमने अशा प्रकारे सुधरणे आवडले होते. प्रत्येक मालिकेचा शेवट हा गोड व्हावा असे प्रत्येकाला वाटते. तसेच झाले होते. पण ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’ असं म्हणतात ते उगाच नाही. कारण सोहम हा वरवर पाहता कितीही चांगला वाटत असला तरी त्याचे काळे धंदे अजूनही सुरु आहेत. हे अगदी पहिल्या काही भागांमधूनच लक्षात आलेले आहे. त्यामुळे पहिले पाढे पच्चावन्न असेच म्हणायची वेळ आली आहे. सोहमचे हे रुप पाहूनही अनेकांना धक्काच बसला आहे. हे पात्र जरी इतर अद्वैत दादरकर साकारात असला तरी देखील या पात्राच्या वागण्यातील बदल हा चक्रावून टाकणारा आहे. 

Bigg Boss 14 फेम राहुल वैद्यला मिळाला मोठा ब्रेक, सलमान खानसाठी गाणार गाणे

मालिकेतील महत्वाची पात्र बदलली

मालिकेचे प्रोमो हा खूप दिवसाआधीपासूनच सुरु झाला होता. या नुसार या मालिकेतील शुभ्रा बदलली आहे हे आधीच कळले होते. शुभ्राचे पात्र सध्या उमा पेडणेकर साकारत आहे. तर सोहमचे पात्र अद्वैत दादरकर साकारत आहे. त्यामुळे हा बदलही काही जणांना तसा रुचला नाहीए. त्यामुळेही मालिकेतील पात्र स्विकारताना प्रेक्षकांना नक्कीच थोडे जड जात आहे. यात काही शंका नाही. 

नव्या चित्रपटासाठी आर्ची सज्ज,नव्या प्रेमकहाणीत दिसणार नव्या रुपात

झालाय मेकओव्हर

आसावरी या पात्राचा यामध्ये चांगलाच मेकओव्हर झाला आहे. पूर्वी अगदी टीपिककल साड्यांमध्ये दिसणारी आसावरी आता वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. आसावरीच्या साड्या तिची स्टाईल आता एका बिझनेस वुमनला शोभेल अशी आहे. त्यामुळे आसावरीतला हा बदल लोकांना खूपच आवडलेला दिसत आहे. 


दरम्यान, तुम्हाला सोहम- शुभ्राच्या नव्या रुपाबद्दल काय वाटते आम्हाला जरुर कळवा.