सुमधुर बासरी, सुंदर लोकेशन्स, मावळतीचा सूर्य आणि प्रेमाविष्कार साकारणारी ‘मी राधिका’ अदिती द्रविड म्हणतेय ‘मोहे रंग दो लाल’…..
View this post on Instagram
अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमित्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिली. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतंच रिलीज झालं. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती ‘राधा’ बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.
टायनी टॉकीज प्रस्तुत पियुष कुलकर्णी दिग्दर्शित हे मॅशअप सुवर्णा राठोडने गायलं आहे, तर हे गाणे अभिनेत्री अदिती द्रविडवर चित्रीत करण्यात आलं आहे.
‘राधा’ विषयी आणि प्रेम गाण्याविषयी अदिती म्हणाली की, ‘’उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम डान्सर असल्याचा फायदा मला झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटा-तूट या संदर्भातल्या अनेक कथा आहेत.
मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहीत होते आणि त्यामुळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तम पद्धतीने साकारू शकले.”
व्हॅलेंटाईन डे आणि प्रेमाविषयी अदितीला विचारलं असता ती म्हणाली, “ व्हॅलेटाईन-डे ला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली ही दैवी भावना या गाण्याच्या शूटिंगवेळी अनुभवता आली. स्वत:ला विसरून दूस-यावर समर्पित भावनेने प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कुल लव्ह स्टोरीज’ना मानते आणि या व्हिडीओच्या शूटींगदरम्यान त्या समर्पित प्रेमातली उत्कटता माझ्या अतरंगी स्पर्शून गेली. “
View this post on Instagram
अदिती द्रविडचा हा राधा नृत्याविष्कार नक्कीच अनुभवण्यासारखा आहे.
हेही वाचा -
अदिती द्रविडच्या शॉर्टफिल्म 'Veerangna' ची निवड पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलसाठी
तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’