बिनधास्त मराठमोळा गायक अवधूत गुप्ते. त्याच्या स्टाईल आणि धमाकेदार गाण्यांसाठी ओळखला जातो. 2020च्या उत्तरार्धात अवधूत पुन्हा एकदा त्याचे नवे गाणं घेऊन सज्ज झाला आहे. मराठी गाण्यांमध्ये सतत प्रयोग करणारा अवधूत आता त्याच्या चाहत्यांसाठी रॅप साँग घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. पण हे रॅप थोडे खास असणार आहे कारण केवळ मनोरंजन हे त्याचे उद्दिष्ट नाही तर या गाण्यातून लोकांपर्यंत एक महत्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक विषयावर पहिल्यांदाच अवधूत गुप्तेने त्याच्या गाण्यातून प्रकाश टाकला आहे. नेमकं हे रॅप साँग काय आहे ते पाहुया
Bigg Boss 14: घरात सुरु झालं आहे जास्मिन-अली-निकी असं लव्ह ट्रँगल
माणुसकीची गरज
समाजातील ज्वलंत विषयापैकी एक विषय म्हणजे ‘माणुसकी’ या विषयाला हात घालतच अवधूतने हे रॅप साँग तयार केले आहे.समाजात इतर जातींपेक्षा माणुसकी ही जात किती महत्वाची आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याने या नव्या गाण्याचा माध्यमातून केला आहे. पहिल्यांदाच असा मोठा विषय मराठी रॅपच्या माध्यमातून मांडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याचे हे गाणे युट्युबवर अद्याप रिलीज झालेले नाही. पण याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते या व्हिडिओमध्ये पुणेरी पगडी आणि फेटा या लुकमध्ये दिसत आहे. 32 सेंकदाच्या या ट्रेलरमध्ये ‘जात साली जाता जात नाही’ ही इतकीत ओळ ऐकू येते. या रॅपचे पुढचे बोल काय असतील ही उत्सुकता त्यामुळे वाढून राहते. समीर सामंत याने हे गाणं संगीतबद्ध केले असून विक्रम बाम याचे संगीत या रॅपला लाभले आहे. त्यामुळेच हे गाणं उत्सफुर्त असे आहे.
अवधूतचा संवेदशनशील विषयाला हात
‘जात’ हा शब्द जरी उच्चारला तरी समाजात भेग पडायला सुरुवात होते. अशा नाजूक आणि संवेदनशील विषयावर एक रॅप तयार करण जोखमीचं काम असतं. पण कोणाच्याही भावना न दुखावता अत्यंत उत्तमरित्या हे रॅप लिहून त्यातून माणुसकीच खरी जात आहे. असा संदेश देण्यात आला आहे, असे अवधूत सांगतो. शिवाय तो पुढे म्हणाला की, आतापर्यंत मी अनेक गाण्यांचे प्रकार हाताळले आहेत. पण काहीतरी सतत राहून गेले असे जाणवत होते. त्यातूनच रॅपची संकल्पना सुचली.आपण कितीही म्हटले तरी अनेकदा हा मुद्दा डोकं वर काढतोच. समाजात इतर जातींपेक्षा ‘माणुसकी’ ही जात महत्वाची आहे आणि टिकवणे फार गरजेचे आहे.
मराठीतील अशा प्रसिद्ध जोड्या ज्यांनी नव्या वर्षात द्यावी गुड न्यूज, चाहत्यांची इच्छा
अवधूतची गाणी हिट
अवधूत हा एक उत्तम मराठी गायक आहे हे सांगायला नको. मराठीत गाण्यांवर वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अवधूतची अनेक गाणी प्रसिद्ध आहे. रिमिक्सच्या काळात अवधूतने काही विस्मृतीत गेलेल्या काही मराठी गाण्यांना पुन्हा एकदा रिमिक्सच्या रुपात आणले आहेत. त्यापैकीच एक गाणं म्हणजे ‘बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला’ सुरुवातीला त्याच्या गाण्यावर बराच आक्षेप घेतला गेला. पण हे गाणं अनेकांना इतकं आवडलं की, आजही हे रिमिक्स गाणं अनेकांच्या लक्षात आहे. त्यामुळे अवधूत गुप्तेचा हा नवा प्रयोगही तितकाच उत्कंठा वाढवणारा आहे हे नक्की!
#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील