logo
ADVERTISEMENT
home / Bigg Boss
जान सानूला घरी ठेवण्यासाठी शहजादला घरातून केले बेघर, लोकांनी व्यक्त केली नाराजी

जान सानूला घरी ठेवण्यासाठी शहजादला घरातून केले बेघर, लोकांनी व्यक्त केली नाराजी

बिग बॉस 14 ही स्पर्धा सुरु होऊन आता दोन आठवडे झाले आहे. या दोन आठवड्यात बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. मराठमोळा राहुल वैद्य हा अनेकांच्या पसंतीस उतरतो आहे. तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. पहिल्या आठवड्यात सारा गुरुपाल बाहेर पडल्यानंतर या आठवड्यात कोणाचा नंबर लागेल असा प्रश्न पडला असताना या आठवड्यात टर्बन मॉडल शहजाद देओल बाहेर पडला आहे. पण शहजादचे जाणे अनेकांना अजिबात रुचलेले नाही. कुमार सानू यांचा मुलगा जान सानू या खेळासाठी योग्य नसतानाही केवळ कुमार सानूचा मुलगा म्हणून त्याला घरी ठेवण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळे नेपोटिझमचा मुद्दा आता बिग बॉस संदर्भातही बोलला जात आहे.

श्वेता तिवारीने मुलीसोबत केलं बोल्ड फोटोशूट, बिकिनी लुक होतोय व्हायरल

शहजादला अचानक केले गायब

वीकेंड का वारच्या दिवशी सलमानची शाळा सुरु झाल्यानंतर  शहजादला फार काही प्रश्न विचारण्यात आले नाही. शहजाद- निशांतमध्ये रंगलेला टास्क किंवा या आधी झालेले कोणत्याही टास्कमध्ये शहजादने आपली उत्तम कामगिरी दाखवली नाही. त्यामुळे त्याला गायबचा डगा घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तो घरात एक दिवस हा डगला घालून दिसला. त्याला गायब हा दर्जा दिल्यानंतर तो या घरातील सिक्रेट रुममध्ये जाईल का? असा प्रश्न अनेकांना पडला असताना अचानक त्याला सिनिअर्ससोबत घरातून बाहेर काढण्यात आले. घरातील सदस्यांना जान सानूला वाचवत मुद्दाम शहजादचे नाव पुढे केल्याचा आरोप शहजादच्या फॅन्सनी केला आहे. त्यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

नेहा कक्कर खरंच करतेय लग्न, रोका व्हिडिओ वायरल

ADVERTISEMENT

शहजादने सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

स्वत:शहजादही त्याच्या बाहेर पडण्यावर नाराज आहे. त्याने ही नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करुन दाखवली आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना हा नवा प्रवास इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते. घरात सगळे काही नियमानुसार खेळले जाईल असे वाटले होते. पण असे झाले नाही. पण काहीच हरकत नाही. हा निर्णय तुमच्यावर नव्हता.तर घरातील सदस्यांवर होता. त्यामुळे तुमचे प्रेम माझ्यावर असेच राहू द्या. तुमचे मनोरंजन मी या पुढे नक्कीच करीन.

साराच्या जाण्यानंतर थंडावला गेम

साराच्या जाण्यानंतर थंडावला गेम

Instagram

सारा आणि शहजाद हे दोन पंजाबी सेलिब्रिटी या गेम शोचा भाग होते. त्यामुळे साहजिकच त्यांचे घरामध्ये चांगले जमत होते. सारा या खेळातून बाहेर पडल्यानंतर सिनिअर्सच्या मतानुसार त्याचे घरातून लक्ष उडाले होते. तो घरात एकटे राहणे पसंत करत होता. कोणत्याही खेळात त्याचा सक्रिय सहभाग नव्हता. त्यामुळेच तो खेळाचा ट्रॅक सोडत असल्याचे घरातील अनेकांना वाटले. म्हणूनच त्याला खेळातून बाहेर काढण्यात आले.

ADVERTISEMENT

रिंकू राजगुरू करणार सुव्रतवर ‘छूमंतर’

जान सानूवर नाराज प्रेक्षक

अनेकांच्या म्हणण्यानुसार या खेळातील स्पर्धक जान सानू हा काहीच कामाचा नाही. तो आपले मुद्दे आणि आपली मत ठामपणाने मांडत नाही. घरात त्याला काहीच महत्व नसताना आणि त्याला घराबाहेर जाण्यासाठी अनेकांनी मत दिली असताना अचानक शहजादला या खेळातून बाहेर काढणे म्हणजे नेपोटिझम करण्यासारखे आहे. असे अनेकांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आता या घरात सुरु असलेल्या टास्कमधून कोण पुढे जाणार आणि कोण मागे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 

21 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT