Advertisement

Celebrity gossip

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो आणि बिपाशा बासूच्या लिंकअपच्या चर्चा, पुन्हा एकदा

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jul 24, 2020
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो आणि बिपाशा बासूच्या लिंकअपच्या चर्चा, पुन्हा एकदा

Advertisement

बॉलीवूडमध्ये लिंकअप- ब्रेकअपच्या चर्चांना कधी उधाण येईल काही सांगता येत नाही. आता बिपाशा बासूचा एक फोटो चांगलाच वायरल होत आहे. या फोटोमध्ये जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो आणि बिपाशा बासू एकत्र दिसत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडाला आहे. करण सिंह ग्रोवर यांच्यासोबत लग्न करुन सुखाचा संसार करणाऱ्या बिपाशाच्या आयुष्यात एक परदेशी पाहुणाही होता याचे आश्चर्य अनेकांना वाटत आहे. पण हे नेमकं प्रकरण काय आहे ते सगळ्यात आधी जाणून घेऊया.

बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो,करण सिंह ग्रोव्हर करतोय कौतुक

बिपाशा आणि रोनाल्डो, खरंच

एखाद्या अभिनेत्रीच्या अफेअर्सच्या चर्चा होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. त्यांचे ब्रेकअप वगैरे वाचण्यात, पाहण्यात लोकांना फार मजेशीर वाटते. बिपाशाचीही नाव अनेकांशी जोडली गेली. पण त्यामध्ये रोनाल्डो हे नाव असेल असे कोणालाच माहीत नव्हते. इतकेच काय तिच्या फॅन्सनाही या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. हा फोटो सगळीकडे वायरल होऊ लागल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. बिपाशा आणि रोनाल्डो यांचे काही असेल असे कधीच वाटले नव्हते. पण आता या फोटोंवरुन याची का चर्चा होत आहे, हे कळले. बिपाशाचे रोनाल्डोसोबतचे अनेक फोटो सध्या ट्विटरवर वायरल होत आहेत.

#throwback फोटोमुळे झाला गोंधळ

बिपाशा आणि रोनॉल्डोचा हा फोटो 2007 सालातील आहे. लिस्बन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये या दोघे एकत्र आले होते. हा कार्यक्रम जगातील सात आश्यचर्यांना नाव देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर ही दोघे पार्टीमध्येही एकत्र दिसले होते. त्या दरम्यान त्यांचे अनेक फोटो काढण्यात आले. यातील एक फोटो रोनाल्डो बिपाशाला किस करतानाचाही आहे.त्यावेळी तेथील एका इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्या अफेअर्सच्या बातम्या तिखट- मीठ लावून लिहिल्या होत्या ही गोष्ट दोघांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनीही यावर नाराजी दर्शवली होती. पण आता पुन्हा या फोटोंनी नवा गोंधळ सुरु केला आहे.

बालाजी प्रोडक्शनच्या नावाखाली चालते अश्लीलता, एकता कपूर आली अडचणीत

मीम्सनाही उधाण

अनेकांना बिपाशाचे हे सिक्रेट कळल्यानंतर त्यावर मीम्सही करायला अनेकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे बिपाशा बासू सध्या ट्विटरवर चांगलीच ट्रेंड करत आहेत.  पण इतक्या वर्षांनी हा फोटो समोर आणणे अजूनही रुचण्यासारखे नाही.

बिपाशा करण सिंहसोबत सुखात

बिपाशा बासूने करण सिंह ग्रोवरसोबत लग्नगाठ बांधली असून या दोघांची ओळख एका चित्रपटादरम्यान झाली आणि त्याच सेटवर त्यांचे प्रेमही जुळले. मग काय दोघांनी कसलाही विचार न करता लग्न केले. बिपाशाने करणसिंहसोबत लग्न करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना पटला नव्हता. कारण करण सिंह ग्रोवरने या आधी दोन लग्न केली होती. ती लग्नही त्याने घाईत केली होती. पण लग्नाचा काही कालावधी जात नाही तोच त्याने घटस्फोट घेतला होता. पण बिपाशासोबत लग्न केल्यानंतर तो आता फारच बदलला असे दिसत आहे. 

रोनाल्डोसोबतच्या लिंकअपच्या चर्चा खोट्या असल्या तरी या दोघांच्या जोडीला मात्र अनेकांनी हिरवा कंदील दाखवल्याचेही दिसत आहे. पण आता असे होणेही शक्य नाही.

नाईट ड्रेस घालून हिनाने शेअर केला व्हिडिओ, ट्रोलर्सचे तोंड केले बंद