Advertisement

Celebrity gossip

बाहुबलीतील भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत, फोटो झाले वायरल

Leenal GawadeLeenal Gawade  |  Aug 9, 2020
बाहुबलीतील भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत, फोटो झाले वायरल

लॉकडाऊन काही संपायचे नाव घेत नाही. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी त्यांनी लग्न पुढे ढकलली.अनेक सेलिब्रिटींनीही त्यांची लग्न पुढे ढकलली. पण आता नियमांचे पालन करत सेलिब्रिटींनीही मास्क लावून लग्न करण्यास पसंती दिली आहे. नुकत्याच बाहुबलीच्या भल्लालदेवने म्हणजेच अभिनेता राणा दुग्गबत्तीने लग्न केले आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. अत्यंत मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत त्याचा हा विवाहसोहळा पार पडला आहे. तर अनेकांनी या नव दांपत्याला ऑनलाईनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असल्याचे समजत आहे. साऊथमधील एक आयकॉनिक बॅचलर म्हणून राणाची ओळख होती. राणाच्या लग्नामुळे त्याच्या फॅन्सनेही आनंद शेअर केला आहे.

भोजपुरी अभिनेत्रीने केली आत्महत्या,मरण्यापूर्वी केले फेसबुक लाईव्ह

राणाने हल्लीच दिली होती प्रेमाची कबुली

View this post on Instagram

And she said Yes 🙂 ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on May 12, 2020 at 4:17am PDT

साऊथ सुपरस्टारचा एक वेगळा फॅन बेस आहे. राणाने अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत. पण त्याला विशेष ओळख मिळाली ती बाहुबलीतील ‘भल्लालदेव’या पात्रामुळे. त्याने या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली असली. तरी त्याने या भूमिकेला न्याय देण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. त्यामुळे त्या दिवसापासून राणा चर्चेत होता. शिवाय चित्रपटाशी निगडीत असलेली एखादी अशी व्यक्ती सिंगल कशी असू शकते? याचीही चर्चा होत होती. पण राणाने त्याच्या रिलेशनशीपबद्दल कधीच कोणतीही माहिती दिली नव्हती. पण काहीच महिन्यांपूर्वी त्याने एक फोटो शेअर केला आणि त्याच्या रिलेशनशीपवरुन पडदा उठला. मिहिका बजाजसोबत त्याने नात्यात असल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतरच त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्याने साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता. आणि आता त्याच्या लग्नाचे फोटो चांगलेच वायरल झाले होते. 

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

कमी लोकांच्या उपस्थित पार पडला सोहळा

सध्या कोरोनाचे दिवस आहेत. त्यामुळे बरीच नियमांचे पालन करावे लागत आहे. राणा दुग्गबत्तीच्या लग्नालाही काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. राम चरण,समँथा प्रभू, नागा चैतन्य अशी काही ठराविक मंडळीच उपस्थित होती. तर काहींनी त्याला ट्विटरच्या माध्यमातून आणि इन्स्टाग्रामवरुन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

राणा दुग्गुतीने केल होते वजन कमी

राणा दुग्गबत्ती म्हटल्यावर एक भारदस्त पर्सनॅलिटी आपल्या डोळ्यासमोर उपस्थित राहते. पण त्यानंतर त्याने त्याचा बारीक झालेला एक फोटो शेअर केला आणि त्याला काय झाले अशा चर्चा होऊ लागल्या. राणा दुग्गबत्ती असा दिसू शकत नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. खूप चर्चा झाल्यानंतर अखेर राणाने मौन सोडले आणि त्याने का बारीक झालो याचा खुलासा केला. एका चित्रपटासाठी त्याने त्याचे वजन कमी केले होते. बाहुबली या चित्रपटासाठी त्याला भारदस्त दिसण्याची गरज होती. पण त्यानंतर त्याला वेगवेगळे रोल्स मिळू लागले आणि त्याने त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली.

सध्या तरी त्याच्या या लग्नातील सुंदर फोटोंचीच सगळीकडे चर्चा होत आहे. राणा दुग्गबत्तीला POpxoमराठी कडून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

अभिनेता जय भानुशाली स्टंट करताना जखमी, शेअर केला व्हिडिओ