logo
ADVERTISEMENT
home / Bollywood
जखमी अवस्थेतही ‘या’ अभिनेत्रीने केलं अजय देवगणसोबत शूटिंग

जखमी अवस्थेतही ‘या’ अभिनेत्रीने केलं अजय देवगणसोबत शूटिंग

अजय देवगणच्या मेडे (Mayday) या चित्रपटात अभिनेत्री आकांक्षा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.आकांक्षाने चार वर्षापूर्वीच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यापूर्वी तिने हिंदीतून बद्रिनाथ की दुल्हनिया,तेलूगू चित्रपट मल्ली राव आणि देवदास तसंच कन्नड चित्रपट पहलवानमध्ये काम केलं होतं. या व्यतिरिक्त तमिळ तेलुगूमध्ये आणखी अनेक चित्रपटात काम केलं आहे. लवकरच ती अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्यासोबत मेडेमध्ये मध्ये दिसणार आहे. मेडेमध्ये आकांक्षा अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत असेल. मात्र काही  दिवसांपूर्वीच शूटिंग दरम्यान आकांक्षाला एका गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. तिच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकांक्षाने जखमी अवस्थेतही चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 

आकांक्षाने का घेतला हा निर्णय

हैदराबादमध्ये शूटिंग करत असताना आकांक्षा जखमी झाली होती. पायाला गंभीर दुखापत होऊनही आकांक्षाने तिचं शूटिंग थांबवलं नाही. जर तिने या कारणासाठी शूटिंग थांबवलं असतं तर त्यामुळे निर्माता आणि इतर कलाकार, शूटिंग टिम यांचं नुकसान झालं असतं.  म्हणूनच तिने तिचं शूटिंगचं शेड्यूल पूर्ण केलं. त्यानंतर रिकव्हर होण्यासाठी काही काळासाठी एक छोटा ब्रेक घेतला. हैदराबादवरून आल्यावर आदल्याच दिवशी मुंबईचं शूटिंग सुरू झालं होतं. अजूनही तिची पूर्ण रिकव्हरी  झालेली नाही. मात्र तिने तिचं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. आपल्यामुळे इतरांचे नुकसान होऊ नये यासाठी आकांक्षाने हा मोठा निर्णय घेतला. 

आकांक्षाचा दुसरा बॉलीवूड चित्रपट

आकांक्षाचा हा  दुसरी बॉलीवूड चित्रपट आहे. तिने तिच्या बॉलीवूड करिअरची सुरूवात वरूण धवन आणि आलिया भटसोबत ब्रदिनाथ की दुल्हनिया मधून केली होती. त्यासोबतच तिने तमिळ, तेलूगू आणि  कन्नडमध्ये लीड रोल केलेले आहेत. आकांक्षा मुळची जयपूरची असून तिने तिच्या अभिनयाला टिव्ही सिरिअलमधून सुरूवात केली होती. ना बोले तुम ना मैंने कुछ कहा या मालिकेत तिने काम केलं होतं. या मालिकेत तिने मेघा भटनागर नावाच्या एका सिंगल महिलेची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने गुलमोहर ग्रॅंड या मालिकेतही काम केलं होतं. ज्यात तिने एका किशोरवयीन मुलीची भूमिका साकारली होती. अजयच्या मते या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल्ड शूटिंग 19 जानेवारीला संपेल. मेडेचं कथानक काय असेल ते अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.  मात्र यात अजय देवगण आणि रकुलप्रीत सिंह पायलटची भूमिका साकारणार आहेत. अंगिरा धर वकिलाच्या भूमिकेत असेल, आकांक्षा सिंह अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारेल तर महानायक अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेविषयी अजून काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. 

अजय देवगन दिग्दर्शित मेडे

मेडे चित्रपटाचं दिग्दर्शन अजय देवगण स्वतः करत आहे.  आकांक्षासोबत या चित्रपटात रकुलप्रीत सिंह आणि अंगिरा धरपण दिसणार आहे. सध्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. मेडे पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल. अजय देवगणने या चित्रपटाचं शूटिंग मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू केलं आहे. ट्विटरवर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत अजय देवगणने  शेअर केलं होतं की, मेडेच्या शूटिंगला सुरूवात केल्याने मी आनंदी आहे. स्टार्ट टू फिनिश शेड्यूल  आहे. परमेश्वर आणि माझ्या आईवडिलांचा आर्शीवाद घेतला आहे. फॅन्स, कुटुंब आणि शुभचिंतकांशिवाय काहीच शक्य नाही. 29 एप्रिल 2022 ला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

लाल सिंह चड्ढा प्रदर्शित होईपर्यंत बंद असणार आमिर खानचा फोन

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स

ADVERTISEMENT

तब्बूमुळे रखडलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया 2’ चं शूटिंग

02 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT