जून 2020 मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असताना अचानक एका बातमीने अनेकांचे मन पिळवटून टाकले ते म्हणजे सुशांत सिंहची आत्महत्या. काही काळासाठी या बातमीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. पण ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. एखाद्या यशस्वी कलाकारावर आत्महत्या करण्याची वेळ का यावी? या सारखे अनेक विषय त्या काळात चघळले गेले. पण ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न उभा राहिल्यानंतर बॉलिवूड जगताशी संबंधित अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे पुढे आली. या प्रकरणात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष असा आरोपाचा ठपका सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आला. अनेकांनी तिला दोषी ठरवून सोशल मीडियावर तिची चांगलीच खरडपट्टी केली. पण हे प्रकरण सोडणवण्याऐवजी त्याचा गुंताच झाला.पण आता या सगळ्या प्रकरणाच्या तब्बल 7 महिन्यानंतर रिया चक्रवर्ती घराबाहेर पडली आहे. तिचे काही फोटो पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण: आतापर्यंत या गोष्टींचा खुलासा
घराच्या शोधात रिया
रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला 2020 मध्ये खूप काही झेलावे लागले आहे. सुशांत सिंह मृत्यूशी तिचा संबंध असल्यामुळे तिच्या राहत्या ठिकाणी अनेकांनी त्यांना अपराध्याची वागणूक दिली. त्यामुळे तिच्याबद्दल अनेकांचे मत खराब झाले आहे.तिचा भाऊ शौविक आणि तिला तुरुंगात काही दिवस काढावे लागले आहेत. दोघेही जामिनावर सध्या बाहेर आहेत. सध्या रिया नव्या घराच्या शोधात असल्याचे कळत आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात ती अनेकदा दिसली आहे. तिचा भाऊ शौविक आणि ती दोघंही घर शोधण्यासाठी सध्या फिरत आहेत. रियाचा एक नवा फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तिने एक पुल ओव्हर घातल असून त्यावर ‘love is power’असे लिहिलेले आहे. ज्या टिशर्टचीही सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रियाने सुशांत सिंह राजपूत गेल्यापासून त्यांच्या नात्याला नकार दिला नव्हता. तिने प्रेमाची कबुली देतच ती या संकटाला सामोरी गेली होती. त्यामुळे आता हा मेसेज म्हणजे सुशांत सिंह राजपूतचे प्रेम आणि त्याच प्रेमाची ताकद असावी असे तिचे फॅन्स म्हणत आहे.
या कारणामुळे झाले होते अंकिता-सुशांत सिंहचे ब्रेकअप
बदलले सामाजिक जीवन
सुंशात सिंह राजपूत प्रकरण ज्यावेळी ड्रग्जशी जोडले गेले. त्यानंतर अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या. रिया चक्रवर्तीचा भाऊ ड्रग्ज आणून द्यायचा त्यामुळे NCB ने दोन्ही बहीण-भावांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. रियाने अनेक अशा बड्या सेलिब्रिटींची नावं यामध्ये घेतली की, ऐन लॉकडाऊनमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण इतके वाढले की, सुशांत सिंह राजपूतचा खून झाला आणि तो रियानेच केला असा एक समज सगळीकडे पसरला. ज्याचा फटका रिया आणि तिच्या कुटुंबाला बसला. रियावर सुशांतशी निगडीत असा कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्याची हत्या झाली असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळेच तिला जामिन देऊन थोडासा दिलासा दिला आहे. पण अद्यापही तिचे आयुष्य पूर्वपदावर आलेलेल दिसत नाही.
सुशांत सिंह आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी आपल्या वांद्रे येथील घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. प्राथमिकरित्या त्याने आत्महत्या केली असे म्हटले जात होते. पण त्यानंतर यामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या. अनेक चौकशीमध्ये याचा ड्रग्जशी संबंध असल्याचे समोर आले. मानसिक ताणवाखाली असलेला सुशांत ड्रग्जच्या आधीन होता. त्याला त्याची सवय लागली होती. त्याचे इलाज सुरु होते. पण तो गांजा ओढत होता.असे रियाने मुलाखतीत सांगितले होते
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. याचा मोठा तोटा रियाला झाला आहे हे नक्की!
सुशांतच नाही तर या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचाही पेच राहिला कायम