चंदनाच्या पावडरप्रमाणेच चंदनाच्या तेलाचादेखील सौंदर्य खुलवण्यासाठी वापर केला जातो. चंदनाचे तेल चंदनाच्या खोडापासून काढले जातं.चंदन तेलामध्ये चंदनाचे गुणधर्म आणि सुंगध दोन्ही असतं. याशिवाय चंदनतेल अॅंटिसेप्टीक आणि दाह कमी करणारे आहे. चंदनाच्या तेलाचा वापर त्वचेवर केल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. निरोगी त्वचेसाठी, मेंदूचे कार्य उत्तम चालण्यासाठी, स्नायू आणि हाडांच्या मजबूतीसाछी तुम्ही चंदनतेलाचा वापर करू शकता. चंदन तेल हे एक प्राचीनकाळापासून वापरण्यात येत असलेलं, आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेलं तेल आहे. ज्यामुळे धार्मिक विधीत, मेडीटेशनसाठी, आर्युर्वेदिक उपचारांसाठी या तेलाचा वापर केला जातो. चंदनाच्या तेलामुळे तुमचे शरीर आणि मन शांत आणि निवांत होते. यासाठी यंदाच्या दिवाळीला आनंद द्विगुणित करण्यासाठी चंदनतेलाचा वापर जरूर करा.
वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणाचा तुमच्या त्वचेवर सतत परिणाम होत असतो. ज्यामुळे चेहऱ्यावर वयाच्या आधीच एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र जर तुम्ही नियमित चंदन तेलाचा वापर तुमच्या त्वचेवर अथवा फेसस्क्रबमध्ये केला तर तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, डार्क सर्कल्स, निस्तेजपणा कमी होऊ शकतो.
चंदन तेलात अनेक आश्चर्यकारक गुणधर्म असतात. जर तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर तुम्ही चंदनतेलाचा वापर करू शकता. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेवर एकप्रकारचा नैसर्गिक ग्लो असतो.
चंदनतेलाचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेवरील इनफेक्शन कमी करण्यासाठी वापरू शकता. औषधी गुणधर्मामुळे या तेलाचा वापर तुम्ही जखमा, व्रण, डाग, चट्टे आणि पुरळ घालवण्यासाठी करू शकता. यासाठी तेलाचे काही थेंब दूधात टाका आणि नियमित प्या. ज्यामुळे तुमची त्वचा डिटॉक्स होते.
ज्या लोकांना उच्च रक्तप्रवाहाचा त्रास आहे त्यांच्यांसाठी चंदनतेल अतिशय गुणकारी असतं. जर तुम्ही दूधात चंदन तेल टाकून तुम्ही ते नियमित प्यायला तर तुम्हाला फायदा होईल. ज्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारेल आणि तुम्हाला चांगला आराम मिळेल.
चंदन तेलाने केस आणि त्वचेवर मसाज केल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. यासाठी दिवाळीला अभ्यंगस्नान करताना आणि रात्री झोपताना चंदनतेलाने त्वचा आणि केसांमध्ये चंदनाचे तेल लावून मसाज करा. चंदनाच्या तेलामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळते. राग, चिडचिड, थकवा कमी करण्यासाठी चंदनाचे तेल उपयुक्त आहे.
चंदनाचे तेल थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे तुम्ही या तेलाचा वापर मुलांना मालिश आणि त्यांच्या केसांना लावण्यासाठी करू शकता. चंदनाच्या तेलामुळे मुलांना रात्री शांत झोप लागते ज्यामुळे त्यांच्या मेंदूला पुरेसा आराम मिळतो. मेंदू फ्रेश होतो आणि स्मरणशक्ती सुधारते यासाठी चंदन तेलाचा वापर लहान मुलांसाठी जरूर करा.
चंदन तेलामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे जर तुम्ही या तेलाचा वापर शरीरावरील सूज कमी करण्यासाठी करू शकता. सूज आलेल्या भागावर चंदनतेल हळूवारपणे लावा. या भागाला मसाज करू नका. चंदनतेलातील गुणधर्मांमुळे तुमच्या सूज आलेल्या भागाचा दाह आणि जळजळ कमी होईल.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
चंदनाचे 'हे' आरोग्यदायी फायदे अवश्य जाणून घ्या