ADVERTISEMENT
home / Festival
देशभक्तीपर गीते

देशभक्तीपर गीते ज्यांनी केला जातो ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा (Marathi Patriotic Songs)

स्वातंत्र्यदिन म्हटला की, प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आणि मनात एक वेगळाच उत्साह दाटून येतो. प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि उत्साहाचा असतो. अगदी त्यादिवशी सगळीकडेच भारतामध्ये कमालीच उत्साह दिसून येत असतो. यावर्षी भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र होऊन तब्बल 73 वर्ष पूर्ण करत आहे. महात्मा गांधी यांचे विचार आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राण गमावत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं आहे. इतकंच नाही अजूनही देशाच्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करत लाखो सैनिक आपले प्राण पणाला लावत आहेत. आपल्या या सैनिकांना नेहमीच आपला मानाचा मुजरा असतो. पण असे काही खास दिवस असतात जे त्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. असाच एक दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. अशाच आपल्या देशाचे गौरव वर्णिलेली अनेक गाणी आपल्याला माहीत असतात. आपण ती या दिवशी लावतोही. पण अशी देशभक्तीपर गीते कधीही ऐकली तरी आपली छाती नक्कीच अभिमानाने फुलून येते. अशाच काही मराठी आणि हिंदी गाण्यांची साथ घेत यावर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करूया. 

Table of Contents

  1. बलसागर भारत होवो (Balsagar Bharat Hovo)
  2. सागरा प्राण तळमळला (Sagara Pran Talmalala)
  3. जयोस्तुते जयोस्तुते (Jayostute)
  4. हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे (He Rashtra Devtanche)
  5. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा (Priya Amucha Ek Maharashtra Desh Ha)
  6. जिंकू किंवा मरू (Jinku Kiva Maru)
  7. मंगल देशा पवित्र देशा (Mangal Desha Pavitra Desha)
  8. उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला (Utha Rashtraveer Ho)
  9. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे (Ya Bhartat Bandhubhav Nitya Vasu De)
  10. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती (Shoor Amhi Sardar)
  11. झेंडा अमुचा प्रिय देशाचा (Jhanda Amucha)
  12. आता उठवू सारे रान (Aata Uthavu Saare Raan)
  13. सैनिकहो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumchyasathi)
  14. खरा तो एकची धर्म (Khara To Ekchi Dharma)
  15. अमुचा भारत देश महान (Amucha Bharat Desh Mahan)
  16. उष:काल होता होता (Ushakal Hota Hota)
  17. ध्वज विजयाचा उंंच धरा रे (Dhwaj Vijayacha Unch Dhara Re)
  18. गर्जा जयजयकार क्रांतीचा (Garja Jaijaikar Kranticha)
  19. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् (Ved Mantrahun Amha Vandya Vande Mataram)
  20. नवजवान सैनिका (Naujawan Sainika)

बलसागर भारत होवो (Balsagar Bharat Hovo)

सानेगुरूजींची ही असणारी कविता सर्वांनाच ऐकत राहावीशी वाटणारी आहे. भारताने नेहमी सामर्थ्यशाली राहायला हवं अशा आशयाची ही कविता असून यामध्ये प्रत्येक देशवासीने भारताला गरज भासेल तेव्हा आपल्या लोकांसाठी प्राण द्यायला तयार राहायला हवे. आपलं जीवन हे आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं असं यातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हे गाणं ऐकायला लागल्यावर साहजिकच मनात देशभक्तीची भावना नक्कीच उफाळून येते. अशी देशभक्तीपर गीते ही आपल्या देशाची शान आहे. 

सागरा प्राण तळमळला (Sagara Pran Talmalala)

वीर सावरकरांनी आपल्या देशासाठी काय काय केलं याची महती प्रत्येकालाच माहीत आहे. अगदी काळ्या पाण्याची सजा भोगत असतानाही सावरकरांनी आपलं देशावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही. वीर सावरकरांचं मराठी भाषेवर प्रभुत्व होतं. त्यांनी देशभक्तीपर गीत लिहिलेले असून हे गाणं म्हणजे अंगावर काटा आणणारं आहे. देशासाठी असलेली त्यांची ओढ या गाण्यातून दिसून येते आणि प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारं हे देशभक्तीपर गीत आपल्याला नेहमीच स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ऐकायला मिळतं. 

वाचा – 15 ऑगस्टसाठी स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

जयोस्तुते जयोस्तुते (Jayostute)

स्वातंत्र्याचं नक्की काय महत्त्व आहे हे पटवून देणारं हे स्वातंत्र्यवीर सावरकारांनी लिहिलेलं देशभक्तीपर गाणे म्हणजे मराठी साहित्यातील शान आहे. सावरकारांनी परदेशात जाऊन स्वातंत्र्य पाहिलं होतं. त्यामुळे आपल्या भारतीयांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ही कविता लिहिली होती. या गाण्याची महती आजतागायत तशीच आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीदेखील हे गाणं आवर्जून लावलं जातं. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेशांचा संग्रह देखील आम्ही केला आहे

हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे (He Rashtra Devtanche)

ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेलं हे गीत आजही देशातील प्रत्येक सैनिकासाठी महत्त्वाचं आहे. भारताने बराच काळ पारतंत्र्यात घालवल्यानंतर आता चंद्र आणि सूर्य असेपर्यंत भारताचं हे स्वातंत्र्य अबाधित राहू दे अशा अर्थाचं हे गीत आपल्याला बळ मिळवून देतं. या देशात परंपरेचा सन्मान केला जातो. गायिका राणी वर्मा यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक साज चढला आहे. मराठी देशभक्तीपर गीते हे माडगूळकरांचे वैशिष्ट्ये होते. 

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा (Priya Amucha Ek Maharashtra Desh Ha)

आपल्या देशासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपले प्राण पणाला लावले. त्यामुळे आपला महाराष्ट्र हा प्रत्येकाला प्रिय असतो. त्याचीच प्रशंसा करणारं हे गीत आपल्या मनात एक उत्साह निर्माण करतं. महाराष्ट्र राज्यातून अनेक सैनिकही देशासाठी आपले प्राण देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जवानांनादेखील हे गाणं अतिशय प्रिय आहे. देशभक्ती गाणी (patriotic songs in marathi) ही आपल्याकडे अनेक आहेत. 

जिंकू किंवा मरू (Jinku Kiva Maru)

‘छोटा जवान’ या 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील हे गाणं जवानांसाठी खूपच स्फूर्तीदायक आहे. मरेपर्यंत आपल्या देशाचं संरक्षण करत राहणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं या गाण्याच्या ओळींमधून सांगण्यात येतं. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आजही देशभक्तीपर गीतांमध्ये अगदी वरच्या ओळीमध्ये आहे. हे गाणं ऐकल्यानंतर एक प्रकारची स्फूर्ती येते आणि आपलंही रक्त आपल्या देशाच्या भक्तीने सळसळून उठतं. देशावरची गीते आपले रक्त अगदी सळसळवतात. 

ADVERTISEMENT

मंगल देशा पवित्र देशा (Mangal Desha Pavitra Desha)

देशाचं वर्णन करणारं हे गाणं आपल्याला सगळ्यांनाच ऐकायला आवडतं. आपला देश मंगल आणि पवित्र आहे असं प्रत्येक भारतीयालाच वाटतं आणि आपल्या देशाचा अभिमान प्रत्येकालाच वाटायला हवा. आपल्या देशातील महाराष्ट्र राज्य हे असंच अभिमान वाटायला लावणारं राज्य. या ठिकाणाहून देशाचं रक्षण करायला अनेक सैनिक सैन्यात दाखल होतात. त्यामुळे हे गाणं त्यांच्या शौर्यगाथेचं वर्णन करणारं आहे.

उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला (Utha Rashtraveer Ho)

कोणत्याही सैनिकांना लढण्यासाठी निधड्या छातीने मैदानात उतरावं लागतं आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं लागतं ते मन. राष्ट्रवीर हे देशाचं संरक्षण करण्यासाठी कायम तैनात असतात. अशाच राष्ट्रवीरांसाठी हे गाणं लिहिण्यात आलं आहे. लढताना सैनिकांना अधिक शक्ती मिळावी यासाठी हे गाणं लिहिण्यात आलं आहे. देशभक्ति चित्रपटात जरी या गाण्याचा वापर करण्यात आला असला तरीही आपल्या सैनिकांना उत्साह मिळवून देणारं हे गाणं नेहमीच आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या महत्त्वाची महती सांगतं. इतकंच नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पण आपण अशी गाणी लावतो. देश भक्ति गीत मराठी (deshbhakti song in marathi) आपल्याकडे अनेकांनी लिहिली आहेत. त्यामुळे त्याची महतीही आपल्याला माहिती आहे. 

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे (Ya Bhartat Bandhubhav Nitya Vasu De)

भारत देश हा सर्वधर्म समभाव असणारा देश आहे. यामध्ये अगदी सगळ्या जाती धर्माचे लोक राहातात. त्यामुळे त्या प्रत्येक जातीधर्माच्या माणसांमध्ये बंधुभाव नित्य राहिला तर कुठेही जातीधर्माचं राजकारण न होता आपापसात गोडवा कायम राहील हीच भावना आहे. त्यासाठी हे गाणं स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हमखास लावलं जातं. प्रजासत्ताक दिनालाही ही गाणं अगदी आवर्जून ऐकलं जातं. 

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती (Shoor Amhi Sardar)

कोणताही लढा देण्यासाठी आपलं देशावर प्रेम असावं लागतं. अगदी निधड्या छातीने लढताना कोणाचीही भीती बाळगणं हे सैनिकांना शोभा देत नाही. तरूण सैनिकांसाठी हे गाणं लिहिण्यात आलं होतं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. आज इतकी वर्ष होऊनही हे गाणं तितकंच तरूण आहे. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या गाण्याशिवाय दिवस साजरा केल्यासारखं वाटतच नाही. अनेक कार्यक्रमांमध्येही या गाण्याचा समावेश करण्यात येतो.

ADVERTISEMENT

झेंडा अमुचा प्रिय देशाचा (Jhanda Amucha)

कोणत्याही देशासाठी झेंडा आणि त्याचं मान राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसाच भारतीय झेंड्याचाही इतिहास आहे. या झेंड्याचं वर्णन करणारं आणि त्याची महती सांगणारं हे गाणं म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आहे. आपण आपल्या देशाला आपली आई मानतो आणि आई ही प्रत्येक मुलासाठी सर्वस्व असते. त्याप्रमाणेच प्रत्येक सैनिकासाठी देश हा आपल्या आईप्रमाणेच असतो. त्याचीच महती या गाण्यातून नेहमी दिसून येते. 

आता उठवू सारे रान (Aata Uthavu Saare Raan)

दुसऱ्या देशाचा कोणताही अत्याचार अथवा हिंसा ही सहन केली जाणार नाही हे प्रत्येक सैनिकाचं ध्येय असतं. त्यामुळे कोणीही वाकड्या डोळ्याने आपल्या देशावर नजर टाकल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही हे सांगण्यासाठीच ही कविता आहे. साने गुरुजींनी लिहिलेली ही कविता आजही तितकीच तरूण आहे. सैनिकांप्रमाणे शेतकरीदेखील आपल्या देशाची शान आहे आणि त्यांच्यासाठीही काहीही करायची आपली तयारी असते हेच यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सैनिकहो तुमच्यासाठी (Sainik Ho Tumchyasathi)

कोणत्याही देशासाठी सैनिक हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. सैनिकाबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रेमभावना आणि आदर असतोच. 1962 मध्ये झालेल्या भारत आणि चीनमधील युद्धानंतर हे गाणं एका चित्रपटासाठी ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलं होतं. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी हे गाणं आहे. त्याचं बलिदान हे प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवावं हीच यामागची भावना आहे. 

वाचा – लता मंगेशकर मराठी गाणी

ADVERTISEMENT

खरा तो एकची धर्म (Khara To Ekchi Dharma)

साने गुरूजी हे भारत देशाची एक शान होते, आहेत आणि राहतील. खरा तो एकची धर्म हे त्याकाळी त्यांनी इतक्या सुंदर रितीने मांडलं आहे. प्रेमाने जे साध्य होतं ते कधीही भांडणाने साध्य होत नसतं हीच शिकवण साने गुरुजींनी दिली. आज प्रकर्षाने या शिकवणीची गरज भासत आहे. देशासाठी लढताना या गोष्टीचं भान ठेवणंही गरजेचं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अशी संदेश देणं नक्कीच कामी येतं.  

अमुचा भारत देश महान (Amucha Bharat Desh Mahan)

कोणत्याही भारतीयासाठी भारत देश हा अभिमानाचा मुद्दा आहे. या देशाला अनेक गुणवंत लोकांचा इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतातील त्या सर्व हुतात्म्यांचं स्मरण करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अशा गाण्याने सामान्य माणसांनाही स्फूर्ती येते. 

उष:काल होता होता (Ushakal Hota Hota)

इंग्रजाच्या ताब्यात असणाऱ्या भारताची स्थिती दर्शवणारं हे गाणं त्यावेळी आशा भोसले यांनी गायलं होतं. आजही हे गाणं ऐकताना त्यावेळी नक्की काय स्थिती असेल याची पूर्ण कल्पना येते. सुरेश भटांनी लिहिलेलं हे गाणं त्याकाळी तर गाजलंच पण आजही हे गाणं तितकंच प्रेमानं ऐकलं जातं. 

ध्वज विजयाचा उंंच धरा रे (Dhwaj Vijayacha Unch Dhara Re)

कोणत्याही गोष्टीचा विजय मिळवण्यापेक्षा देशासाठी मिळवलेला विजय हा नेहमीच अभिमानास्पद असतो. आपल्या देशाचा झेंडा फडकविताना वाटणारा अभिमान कोणत्याही गोष्टीशी तुलना न करता येण्याजोगा आहे. हा विजयचा ध्वज उंच धरून मिरवायाला सर्वांनाच आवडतं. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे गाणं आपल्या मनातील भावना व्यक्त करतं. 

ADVERTISEMENT

गर्जा जयजयकार क्रांतीचा (Garja Jaijaikar Kranticha)

कोणत्याही गोष्टीला जेव्हा टक्कर द्यायला पुढाकार घेतला जातो तेव्हा ती एक प्रकारची क्रांती असते. या क्रांतीचा जयजयकार करत नेहमीच भारताचा विजय आणि जयघोष दुमदुमला आहे. अशा गाण्यांमुळे आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा नेहमीच मिळत राहाते. फक्त गाण्याच्या बोलातूनच त्यातील उत्साह, देशाप्रती प्रेम या सर्व गोष्टी मनात एकवटून येतात. अगदी एक मे महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा देतानाही या गाण्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 

वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् (Ved Mantrahun Amha Vandya Vande Mataram)

वंदे मातरम् या दोन शब्दात संपूर्ण भारत देश सामावलेला आहे. वेद आणि पुराण ही आपली परंपरा आहे. पण हेदेखील खरं आहे की, याहूनही महत्त्वाचं प्रत्येक भारतीयाला काही असेल तर ते आहे वंदे मातरम्. हा असा शब्द आहे जो उच्चारता क्षणी मनातील देशभक्ती आपोआप जागी होते. आपल्या नव्या पिढीपासून ते अगदी जुन्या पिढीपर्यंत सर्वांनाच या शब्दाने एक सळसळता उत्साह वाटू लागतो. 

नवजवान सैनिका (Naujawan Sainika)

सैनिक हा देशाची शान आहे. सैनिकाप्रती भारताच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा सैनिकाचं बळ जितकं जमेल तितकं शब्दानेही वाढवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. सैनिकाचं आयुष्य जगणं हे नक्कीच अतिशय जबाबदारीचं आणि शौर्याचं काम आहे. त्या प्रत्येक सैनिकाला या गाण्यातून सलाम करण्यात आलेला आहे.

22 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT