लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाची शॉपिंग. प्रत्येक वधू आणि वरासाठी त्यांच्या लग्नसोहळ्यातील लुक आणि इतर गोष्टींबाबत अनेक कल्पना असतात. लग्नसोहळा हा कमीत कमी आठवडाभर चालणारा एक सोहळा आहे. साखडपुडा, मेंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचं रिसेप्शन, पुजा अशा अनेक कार्यंक्रमांसाठी निरनिराळे कपडे आणि दागिने परिधान केले जातात. वधू आणि वर या सर्व सोहळ्यात सेंटर ऑफ एटरॅक्शन असल्यामुळे त्यांचा लुक लग्नात सर्वात आकर्षक आणि शोभेल असा असणे गरजेचं असतं. तुम्ही देखील तुमच्या लग्नाची शॉपिंग करायला सुरूवात केली असेल तर या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
लग्नसोहळा जरी चार ते पाच दिवस चालणारा कार्यक्रम असला तरी लग्नाची पूर्वतयारी ही एक फार वेळकाढू गोष्ट आहे. म्हणूनच लग्नाची तयारी कमीत कमी सहा महिने आधीपासूनच करायला हवी. मुलींच्या खरेदीला नेहमीच वेळ लागतो. शिवाय तुम्हाला प्रत्येक विधीसाठी साडी, लेंहगा, ड्रेस त्यावर मॅचिंग दागदागिने, मेकअप साहित्य, पर्स, फुटवेअर, इनरवेअर अशा अनेक गोष्टी खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे यासाठी लागणारा वेळ आधीच ठरवा. लग्नाच्या इतर तयारीमध्ये या खरेदीचं प्लॅनिंग मुळीच करू नका. शिवाय तुम्हाला इतरांच्या आवडीनुसार कपडे वापरणं आवडत नसेल तर लग्नसोहळ्याच्या खरेदीमध्ये तुम्हाला तडजोड करणं कठीण जाऊ शकतं. यासाठी काही गोष्टींची खरेदी आधीपासूनच करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी तडजोड करावी लागणार नाही. मात्र असं असलं तरी अगदी फार आधी खरेदी होणार नाही याचीदेखील काळजी घ्या. कारण फॅशन आणि ट्रेंड सतत बदलत असतात. तुम्हाला ट्रेंडनुसार खरेदी करायची असेल तर महत्वाची खरेदी दोन महिने आधी करा आणि इतर गोष्टी तुम्ही चार ते पाच महिने आधापासून खरेदी करून ठेऊ शकता.
कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पेपरवर लिहून त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून करतो तेव्हा ती नेहमी परफेक्ट होते. यासाठी लग्नाच्या शॉपिंगसाठी नीट प्लॅनिंग करा. तुमचा सोहळा किती दिवस चालणार आहे, त्यामध्ये किती विधी कधी आणि कुठे होणार आहेत, प्रत्येक विधीमध्ये तुम्ही कोणता पेहराव करणार आहात, तुम्हा दोघांचा पेहराव एकमेकांना मॅच होत आहे का, कोणत्या पेहरावासोबत कोणते दागदागिने तुम्ही वापरणार आहात, प्रत्येक पेहरावासोबत केला जाणारा मेकअप, तुमच्या लग्नसोहळ्या दरम्यान असलेले नवे ट्रेंड, तुमच्या लग्नाची थीम, तुमच्या कपडे आणि मेकअपची रंगसंगती या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करा. या सर्व गोष्टी नोंद केलेल्या असल्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी मदतच होऊ शकते. यासोबतच तुम्ही ज्या ठिकाणी खरेदी करत आहात त्या शॉपिंग सेंटर्स अथवा मार्केटची लिस्ट, त्यांच्या कपड्यांचा रेट, खरेदीसाठी लागणारा वेळ या सर्व गोष्टींचादेखील आधीच विचार करा. असा रिसर्च केल्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला बजेटमध्ये खरेदी करणं सोपे जाईल.
बऱ्याचदा लग्नाची शॉपिंग नातेवाईकांसोबत जाऊन केली जाते. लोकांची मतं, अनुभव यागोष्टींचा फायदा खेरदीत होण्यासाठी असं केलं जातं. मात्र बऱ्याचदा यामुळे फायदा होण्याऐवजी गोंधळच उडतो. यासाठी लग्नाची खरेदी तुमच्या अगदी जवळच्या आणि ज्यांच्यासोबत तुमचे विचार जुळतात अशा लोकांसोबत जाऊन करा. तुमच्या जोडीदाराला लग्नाच्या खरेदीसाठी जरूर घेऊन जा. ज्यामुळे तुमच्या दोघांच्या आवडीनिवडी तुम्हाला नक्कीच समजू शकतात. एकमेंकांच्या आवडीनुसार लग्नाची खरेदी केल्यामुळे तुमचे एकमेकांवरील प्रेमदेखी अधिक दृढ होऊ शकेल.
कोणतीही शॉपिंग सुरू करण्यापूर्वी बजेट ठरवा. तुम्ही तुमच्या दोघांच्या खरेदीचं वेगवेगळं बजेट ठरवू शकता. शिवाय यासोबतच तुम्ही तुमच्या लग्नाचे कपडे, दागदागिने, मेकअप, फुटवेअर, सौंदर्य प्रसाधने अशा गोष्टींसाठी निरनिराळं बजेट ठरवू शकता. खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराला आपलं बजेट सांगितलं तर ते त्याच रेंजमधील वस्तू तुम्हाला दाखवतात. ज्यामुळे विनाकारण बजेट वाढत नाही.
दिवाळीला तुळशीचं लग्न लागलं की लग्नसराईला सुरूवात होते. अगदी जुन, जुलैपर्यंतदेखील लग्नाचे मुहूर्त असू शकतात. त्यामुळे तुमचं लग्न हिवाळा, उन्हाळा की पावसाळा कोणत्या ऋतूत आहे त्याचा विचार खरेदी करताना जरूर करा. कारण जर तुम्ही उन्हाळ्यात लग्न करणार असाल आणि त्याची खरेदी हिवाळ्यापासून सुरू केली असेल तर तुम्हाला खरेदी करताना उन्हाळ्यातील उकाडा आणि गर्मीचा विचार करता आला पाहिजे. शिवाय तुमचं लग्न दुपारी आहे की संध्याकाळी, ए.सी बॅन्क्वॅटमध्ये आहे की लॉनमध्ये, हॉटेलमध्ये आहे की डेस्टिनेशन वेडिंग आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मगच खरेदीला सुरूवात करा.
दर तुम्ही शोरूमध्ये अनेक साड्या, लेंहगा अथवा इतर आऊटफिट ट्राय करत बसला तर तुमचा वेळ वाया जाईल. निरनिराळे कपडे ट्राय करून तुम्ही पुरते थकून जाल. सर्वच कपडे ट्राय केल्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हाल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार नाही. म्हणूनच तुम्हाला जो रंग आणि प्रकार खूप आवडेल असे मोजकेच कपडे निवडा आणि ट्राय करा. ज्यामुळे खरेदी करताना तुम्ही थकणार नाही.
शॉपिंग करण्याआधी मार्केट आधी फिरून घ्या. कारण तुम्ही खरेदी केली आणि नंतर तुम्हाला दुसरी एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही निराश होऊ शकता. मनाप्रमाणे खरेदी करण्यासाठी आधी सर्व मार्केट फिरून घ्या. आवडलेले कपडे निवडा आणि मनसोक्त शॉपिंग करा.
अनेकदा मुली लग्नासाठी वजन कमी करण्याचा विचार करतात. मात्र लग्नाची शॉपिंग तुम्ही आधीच सुरू केलेली असते. म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी तुम्ही किती वजन कमी करणार आहात आणि तुमचा बॉडीशेप कसा आहे याचा विचार करून खरेदी करा. नाहीतर ऐन लग्नाच्यावेळी तुम्हाला कपड्यांच्या फिटींगची समस्या होऊ शकते.
लग्नासाठी तुम्ही तुमच्या आवडीचा रंग आणि कपडे नक्कीच निवडू शकता. मात्र तुमच्या लग्नातील विधींचा नीट विचार करा. कारण काही विधींसाठी तुम्हाला खाली बसावं लागेल, नमस्कार करण्यासाठी सतत वाकावं लागेल यासर्व गोष्टींचा विचार करून तुमचे कपडे आणि त्याचं फिटींग निवडा.
मासिक पाळी सुरू असताना तुमचं शरीर थकलेलं असतं, पोटाचा घेर बदलत असतो, चेहऱ्यावर ताण आलेला असतो अशा वेळी कपड्यांचं माप दिल्यास ते चुकीचं असू शकतं. म्हणूनच अशा वेळी कपड्यांची अथवा इतर गोष्टींची खरेदी करू नका. कपड्यांची माप देखील देऊ नका.
लग्नातील पेहराव आणि तुमचे दागिने मिळतेजुळते असणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याचदा दागिन्यांची खरेदी महागडी असल्यामुळे आधी केली जाते. ज्यामुळे नंतर त्यानुसार कपडे निवडावे लागतात. नेहमी आधी कपड्यांची खरेदी करा आणि त्याचे फोटो दागिन्यांची खरेदी करताना सोनाराकडे घेऊन जा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कपड्यांनुसार दागिने खरेदी करता येतील. आजकाल ब्रायडल इमिटेशनचा ट्रेंड आहे. त्यामुळे लग्नात तुम्ही तुमच्या कपड्यांनुसार असे दागिने निवडू शकता.
आमची शिफारस - पारंपरिक एथनिक लुकच्या साड्या, लेंहगा, ड्रेस आणि इमिटेशन ज्वेलरी आणि पर्ससाठी तुम्ही हस्तकला साडीच्या शॉपमध्ये खरेदी करू शकता.
लग्नातील कपडे नेहमीच भरजरी आणि भडक असतात. त्यामुळे त्याच्यावर मॅच होण्यासाठी हिल्स आणि हेवी वर्क असलेले फुटवेअर निवडले जातात. जर तुम्ही अशा प्रकारचे फुटवेअर निवडणार असाल तर ते आरामदायक असतील याची जरूर काळजी घ्या. कारण लग्नाच्या दिवशी तुम्हाला बराच काळ उभं राहावं लागणार आहे. त्यामुळे ते जितके आरामदायक असतील तितकं तुम्हाला आनंदी राहणं सोपं जाईल.
लग्नाच्या कपड्यांमध्ये तुम्ही जे lingerie वापरणार आहात ती तुम्ही काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. कारण चुकीच्या इनरवेअरमुळे तुमच्या कपड्यांचा लुक बदलू शकतो. यासोबतच तुमच्या हनिमुनसाठी लागणाऱ्या सेक्सी lingerie देखील अगोदरच खरेदी करा.
साखडपुडा, लग्नातील विधींसाठी तुम्ही प्रोफेशनल ब्रायडल मेकअप करून घेण्याचा विचार करत आहात का? मात्र लग्नानंतर काही दिवस तुम्हाला विविध कार्यक्रमांसाठी स्वतःचा मेकअप करता येणं गरजेचं आहे. लग्नानंतर काही दिवस तुमच्या नववधूच्या लुकला तुम्हाला मेंटनेन करावं लागणार आहे. म्हणूनच एक छानसं मेकअप किट आणि त्यात बेसिक मेकअपचं साहित्य जरूर खरेदी करा.
लग्नाची खरेदी हा प्रचंड वेळकाढू प्रकार आहे. कारण एवढी खरेदी करण्यासाठी तुम्हाला सतत शॉपिंग सेंटर्सच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. म्हणूनच या काळात दगदग होऊ नये यासाठी खाण्या-पिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. योग्य आणि पोषक आहार घ्या. सकाळी खरेदीला निघण्यापूर्वी भरपूर आणि पौष्टिक नास्ता करा. पाण्याची बाटली, चांगलं स्नॅक्स, फळे सोबत ठेवा. उन्हात फिरताना कॅप, स्कार्फ, गॉगल जरूर लावा. सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
आमची शिफारस - पैठणी खरेदी करण्यासाठी येवल्याच्या सोनी पैठणी मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. लग्नासाठी रिअल पैठणी तुम्हाला आठ हजारांपासून तीन लाखांपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता.
तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या लग्नाच्या शॉपिंगला सुरूवात करू शकता. लग्नाची तारीख ठरल्यावर आधी सांगितल्याप्रमाणे शॉपिंगचे व्यवस्थित नियोजन करा. तुम्ही नोकरी अथवा व्यवसाय करत असाल तर विकऐंडला तुम्हाला शॉपिंगसाठी वेळ काढावा लागतो. म्हणूनच कमीत कमी चार ते पाच महिने आधी शॉपिंगला सुरूवात करा. जर अचानक लग्न ठरलं असेल तर सुटी घेऊन तुम्हाला शॉपिंग करावी लागेल. यासाठी व्यवस्थित नियोजन करा ज्यामुळे तुमची फार दगदग होणार नाही.
लग्न ही आयुष्यात एकदाच होणारी आणि महत्त्वाची गोष्ट असली तरी लग्नाच्या शॉपिंगवर वायफळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. कारण ते पैसे तुम्हाला इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरता येऊ शकतात. यासाठी लग्न आणि लग्नाच्या खरेदीचं बजेट ठरवा. लग्नाचं बजेट उगाचच वाढवू नका. कारण कमी बजेटमध्येदेखील चांगली खरेदी नक्कीच करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला चांगल्या रेटमध्ये कोणत्या मार्केटमध्ये कोणती खरेदी करता येईल याचा रिसर्च करावा लागेल.
मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी अनेक वेडिंग शॉप आहेत. जिथे तुम्ही नक्कीच लग्नाची खरेदी करू शकता. या शिवाय पैठणी खरेदी करण्यासाठी तुम्ही पैठण अथवा येवलाला जाऊ शकता.
अधिक वाचा-
नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या
नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लूक्स
डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही '10' ठिकाणं आहेत परफेक्ट
वरमालांची शॉपिंग करा इथे (Garland Shopping In Mumbai)
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम