हेअरस्टाईलचा तुमच्या व्यक्तिमत्वावर लगेच परिणाम दिसून येतो. नेहमीपेक्षा वेगळी 'हेअरकट' करुन तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. काहीजणींना तर निरनिराळ्या लुकसाठी दर तीन महिन्यांनी हटके आणि स्टाईलिश 'हेअरकट' करण्याची आवड असते. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीप्रमाणे लुक करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. कधी कधी काहीजणी एखादया सेलिब्रेटीप्रमाणे लुक करण्याचा प्रयत्न करतात मात्र यामुळे तुमचा लुक अधिक खराब होण्याची शक्यता असते. कारण तो हेअरकट तुमचा चेहरा आणि केसांचे टेक्चर या दोन्ही गोष्टींना मॅच व्हायला हवा. यासाठी चेहऱ्याच्या आकारावरून कोणता ‘हेअरकट’ तुम्हाला कोणता हेअरकट छान दिसेल हे अवश्य वाचा.
तुमच्या चेहऱ्याचा आकार आणि केसांच्या टेक्चरनुसार तुम्हाला कोणता हेअरकट अधिक चांगला दिसेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. काही हेअर सलॉनमध्ये लेटेस्ट हेअरकट (Latest Haircut ) करण्याआधीच याबाबत सल्ला देण्यात यतो. तज्ञांच्या मते जेव्हा तुम्ही तुमचा फेस शेप आणि केसांच्या टेक्चरनुसार हेअर कट करता तेव्हा तुमच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. यासाठीच आम्ही तुम्हाला काही ठराविक चेहऱ्यांचे आकार आणि केसांचा पोत यानुसार हेअरकट सुचवत आहोत. तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार आणि केसांच्या प्रकारानुसार यापैकी एखाद्या हेअरकटची निवड करू शकता.
केसांची लांबी आणि टेक्चरनुसार करा हे हेअर कट
हेअर कट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल
तुमच्या चेहऱ्याचा आकार जाणून घेण्यासाठी आधी तुमचे केस मानेवर बांधून घ्या. ज्यामुळे केस तुमच्या चेहऱ्यावर येणार नाहीत. आरश्यासमोर उभं रहा आणि एका मेजरींग टेपने तुमच्या कपाळाचा आकार मोजा. मोजलेल्या मापाची नोंद करून ठेवा. त्यानंतर तुमच्या एका गालापासून अथवा चिकबोन्सपासून दुसऱ्या चिकबोन्सपर्यंतचे माप घ्या. जबडा आणि हनुवटीयामधील माप मोजा. चेहऱ्याची उंची मोजण्यासाठी केसांच्या वरच्या हेअरलाईनपासून ते हनुवटीपर्यंत माप घ्या आणि नोंद करा. आता या मापांनुसार आम्ही खाली दिलेल्या चेहऱ्याच्या आकारामधील तुमच्या चेहऱ्याचा आकार ओळखा.
चांगल्या हेअरकटमुळे तुमचा लुक जितका चांगला दिसतो तितकाच बिघडलेल्या हेअरकटमुळे खराबही दिसू शकतो. यासाठी चेहऱ्याच्या आकारानुसार आणि केसांच्या टेक्चरनुसार हेअरकट करणं फार गरजेचं आहे. एखाद्या सेलिब्रेटीने केलेला हेअरकट तुम्हाला सुट करेलच असे मुळीच नाही. मात्र जर तुम्ही तुमच्या फेस शेपनुसार हेअरकट केला तर त्यामुळे तुम्ही सेलिब्रेटीप्रमाणे नक्कीच दिसू लागाल.
या प्रकाराचा फेस शेप अंड्याप्रमाणे आकाराचा असतो. असा चेहऱ्याची लांबीपेक्षा उंची जास्त असते. हा फेसशेप एक परफेक्ट फेस शेप असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चेहरा असणाऱ्या व्यक्ती निरनिराळ्या हेअरस्टाईल ट्राय करू शकतात.
वाचा - ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती
Also Read 20 Amazing Hairstyles For Saree In Marathi
जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही हेअर कट करताना विशेष खबरदारी घ्यायला हवी. कारण या फेस शेपमुळे तुम्ही थोड्या जाडसर वाटू शकता. गोल चेहऱ्याच्या लोकांनी नेहीमी सटीक हेअर कट करावा. ज्यामुळे तुमचा चेहरा बारीक दिसू शकेल.
ज्यांचा चेहऱ्याचा आकार चौकोनाप्रमाणे दिसतो त्यांना स्क्वेअर फेस शेप असं म्हणतात. अशा चेहरेपट्टीमधील फोरहेड आणि जॉ लाईन एकसमान असते. त्यामुळे अशा चेहऱ्याच्या लोकांनी हेअर कट करताना केसांवर विविध प्रयोग करू नयेत.
जर तुमचा चेहरा कपाळाच्या बाजूने विशाल आणि हनुवटीकडे निमुळता होत असेल तर तुमच्या चेहऱ्याचा आकार हार्ट शेपचा आहे. तुम्ही खाली सूचवलेलेल हेअरकट करू शकता.
या आकाराचा चेहरा थोडाफार अंडाकृती आकाराप्रमाणेच असतो. ओव्हल शेपपेक्षा मात्र जरा जास्त लांब असतो. म्हणून अशा आकाराच्या चेहऱ्यावर तुमचा चेहरा लांबट वाटेल अशा हेअर स्टाईल सुट करू शकतात.
जर तुमचा चेहरा कपाळ मोठं आणि हनुवटी निमुळती असा असेल तर तुमचा फेस शेप डायमंड शेपच्या आकाराचा आहे. अशा प्रकाराचा चेहऱ्याचा आकार दुर्मिळ आढळतो. मात्र अशा फेस शेपवर केसांचा वॉल्यूम चांगला दिसू शकतो.यासाठी अशा प्रकाराचा चेहरा असेल तर हे हेअरकट अवश्य ट्राय करा.
कधी कधी काही जणींचे केस घनदाट आणि लांबसडक असतात तर काही जणींंचे केस पातळ आणि विरळ असतात. त्यामुळे तुमच्या केसांच्या लांबी आणि टेक्चरनुसार हेअर कट करा. नियमित हेअर कट केल्यामुळे हळूहळू तुमचा लुक चेंज होऊ शकतो. हेअर कट केल्यावर तुम्हाला एकप्रकारचा आत्मविश्वास आल्यासारखं वाचतं. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. यासाठी तुमच्या केसांच्या लांबीनुसार आणि टेक्चरनुसार हेअर कट निवडा.
लांबसडक, काळेभोर केस प्रत्येकीचंच स्वप्न असतं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि योग्य हेअर कट निवडणं फार गरजेचं आहे. खरंतर लांब केस असतील तर तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारचा हेअर कट छानच दिसेल. मात्र स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही या प्रकारचे हेअर कट ट्राय करू शकता.
या प्रकारचे हेअर कट कॉलेजला जाणाऱ्या मुलींवर फारच सुंदर दिसू शकतात.
लांब केसांमधील हे लेअर्स तुमचं सौंदर्य अधिकच खुलवतील
जर तुमचे केस कमी लांबीचे असतील तर तुम्ही या ट्रेंडी, साईलिश आणि फॅशनेबल हेअर कट मुळे अधिकच सुंदर दिसाल.
जर तुमचे केस खांद्यापर्यंतच्या उंचीचे असतील तर तुम्हाला हेअर कट करताना नेहमी केस खूप छोटे होतील यांची भिती वाटत असते. जर तुम्हाला शॉर्ट हेअर कट असूनही लांब केस दिसावेत असं वाटत असेल तर हे हेअर कट अवश्य ट्राय करा.
कुरळ्या केसांच्या मुलींना नेहमी कोणता हेअर कट करावा हा प्रश्न पडत असतो. लुक चेंज करण्यासाठी कोणता हेअर कट करावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे हेअर कट जरूर करून बघा.
स्ट्रेट केसांचा तुम्हाला काहीही त्रास नसला तरी काही दिवसांनी तुम्हाला या लुकचा कंटाळा येऊ शकतो. शिवाय अशा केसांचा कोणता हेअर कट करावा हे समजणं नक्कीच कठीण असू शकतं.
स्ट्रेट केसांसाठी वरील हेअरकट सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
भारतातील महिलांचे केस बऱ्याचदा वेव्ही असतात. मात्र अशा केसांची काळजी घेणं थोडं कठीण असतं. जर तुमचे केस वेव्ही असतील तर तुमच्यावर कोणते हेअर कट चांगले दिसतील हे अवश्य जाणून घ्या.
Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे 'हेअर स्पा' कसा कराल
साडी नेसल्यावर या ‘20’ हटके आणि ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुमच्यावर नक्कीच शोभून दिसतील
वेणीचे विविध प्रकार ज्यामध्ये तुम्ही दिसाल अधिक सुंदर आणि आकर्षक
फोटोसौजन्य - शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम